देहूरोड

देहूरोड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

देहूरोड (पिंपरी-चिंचवड) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता देहूरोड येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात (सवाना हॉटेलसमोर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती.


या सभेत देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे प्रशासक ॲड.कैलास पानसरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिक्की कोचर, मनसेचे मोजेस दास, काँग्रेसचे मलिक शेख, गफूर शेख, कृष्णा दाभोळे, अरुण गोंटे, मयूर पिंजण, संजय पिंजण, शुभम दिलीप गोसावी, भरत नायडू, बबन टोणपे, संदीप माने, विष्णू दिवसे, पांडुरंग बालघरे, बाळासाहेब जाधव, राजेश शेलार, राजेश मोरे, देहू शहर प्रमुख पोपट राक्षे, गणेश सावंत, विलास हिनुकुले, रामदास ताटे, रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.संदीप बालघरे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या कर्तृत्वाला, विचारांना व हिंदुत्वाच्या लढ्याला उजाळा देताना भावनिक मार्गदर्शन केले.देहूरोड शहरातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष व शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने “जय भवानी… जय शिवाजी… बाळासाहेब ठाकरे अमर रहे!”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button