पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा ४-५ गाड्यांची जोरदार धडक.

पुणे खबर १७ नोव्हेंबर २०२५
(पुणे प्रतिनिधी: सुरज देवकर.)
गेल्या आठवड्यातच झालेल्या भीषण अपघातानंतर आणखी एक घटना घडली.
अपघातानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरू केली.
Pune Navale Bridge accidents news :
आज दि.१७ नोव्हेंबर रोजी दुपारी पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर चार ते पाच गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे. गेल्या आठवड्यात नवले पुलावर भयंकर अपघात झाला होता. त्यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज दुपारच्या वेळी नवले पुलाच्या तीव्र उतारावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे.

अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती .आठवडाभरात दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने पुणेकरांमध्ये चिंता वाढली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. या अपघातामध्ये अद्याप जिवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. एक ते दोन जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.



