जि. प. प्रा. शाळा नवीन वसाहत, सेलू बु. येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पुणे खबर
दि. २७ जानेवारी २०२६
सेलू बु. | प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन वसाहत, सेलू बु. येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवायती नी उपस्थितांची मने जिंकली.
शालेय समितीचे अध्यक्ष पवन कांबळे (सेलूकर) यांनी देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात देशप्रेमाची भावना जागृत केली. तसेच अनिल देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना २६ जानेवारी चे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगत संविधानातील मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष पवन कांबळे (सेलूकर) व विविध कार्यकारी सोसायटी, सेलू यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हे बक्षीस गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास बालाजी जाधव, प्रल्हाद सांडूर, स्वाती कांबळे, रावसाहेब सांडूर, शालेय समितीचे उपाध्यक्ष दिगंबर सुरवसे, वामन जडाळे सर, बबलू सांडूर, अतिश स्वामी, दामोदर सांडूर, राजू बोयने, साहेबराव कांबळे, केशव दोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शालेय समिती व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

