जागर रमाईचा अभियानांतर्गत रमाई जयंती उत्साहात संपन्न.

पुणे खबर
देहूरोड प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा, देहूरोड शाखा महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा पुष्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागर रमाईचा’ या अभियानांतर्गत त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर यांची जयंती दि. ७ फेब्रुवारी रोजी रमाई विद्यार्थी निवास संकुल, धम्मसदन, शितळानगर देहूरोड येथे अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.

जयंती दिनी सामुदायिक सुत्तपठण, प्रबोधनात्मक प्रवचन, रमाई यांच्या जीवनावर आधारित गीत सादरीकरण तसेच लहान मुलांद्वारे प्रभावी लघुनाट्य सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि एकपात्री नाटकांचे सादरीकरण घेण्यात आले. सर्व स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी युवा नेते बापु कातळे व नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा कातळे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. उपस्थितांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

या अभियानात विद्यार्थी, बालक-बालिका तसेच विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणीतील पुष्पा सोनवणे, छाया शिंदे, संजिवनी चव्हाण, ताराबाई भालेराव, संगिता गायकवाड, सुमन सोनवणे, शोभा इंगळे, ज्योती सवाई, कुंदा फुले यांचे विशेष योगदान राहिले.
प्रमुख उपस्थितांमध्ये रेश्मा कांबळे, सोनाई मराठे, उषा वाव्हळे, दीक्षा कांबळे, प्रतिभा खंडारे, प्रमिला शेजव, राजश्री टेंभुरकर तसेच पुरुष कार्यकारिणीचे प्रकाश चां. कांबळे, राकेश आवाड, प्रकाश कांबळे (रुईकर), उत्तम हिंगे, के. एच. सूर्यवंशी, सुनील कांबळे, अमोल नाईकनवरे, महेंद्र सरोदे, रोहन गायवाड, प्रविण साखरे, आकाश कटारे, नील गायकवाड, संजय कांबळे, सुनील भोसले, प्रमोद शेगोकार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुष्पा संजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता भोसले व सचिव नीलम काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन छाया शिंदे यांनी मानले.

देहूरोड शहर व पंचक्रोशीतील असंख्य अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘जागर रमाईचा’ अभियानामुळे महामाता रमाई यांच्या त्यागमय व प्रेरणादायी जीवनकार्याची उजळणी होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




