वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देहूरोडमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

देहूरोड | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी देहूरोड शहरच्या वतीने भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सुनील मोरे व सुरेश भालेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणाचा मान ईश्वर अगरवाल यांना लाभला. कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे देहूरोड शहराध्यक्ष विशाल चव्हाण, शहर उपाध्यक्ष करीम शेख, खंडेराव गायकवाड, वंचितचे माजी पुणे पश्चिम सचिव व सामाजिक कार्यकर्ते सुरेश भालेराव यांच्यासह अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षा वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुरेश ढमाले, सलीम शेख, राजा सरदार, सुभान भाई शेख, तरस, विजू भाई, कैलास बीडलान, गुड्डू भाई, रफिक शेख, रज्जाक शेख, राजेश वाल्मिकी, गांधी वाल्मिकी, गणेश बनसोडे, रफिक शेख, संतोष केन्नाड आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तसेच अमित पगारे, किरण क्षीरसागर, शशिकांत सप्पागुरू हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अप्पू शिवशरण यांनी केले.
या कार्यक्रमातून संविधानिक मूल्ये, लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत प्रजासत्ताक दिनाचा सन्मान करण्यात आला.




