देहुरोड येथे हजरत हाजी अब्दुल रहेमान मलंग शाह (हाजी मलंग बाबा) यांचा ऊर्स होणार साजरा.

पुणे खबर दि. ३१ जानेवारी २०२६
देहुरोड : येथील इंदिरानगर येथे हजरत हाजी अब्दुल रहेमान मलंग शाह ऊर्फ हाजी मलंग बाबा यांच्या पवित्र ऊर्स निमित्त संदल (पालखी) सोहळा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता हाजी मलंग बाबा यांची संदल (पालखी) इंदिरानगर येथील राहत्या घरातून निघून दर्ग्या पर्यंत नेण्यात येणार आहे. या संदल (पालखी) सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, धार्मिक श्रद्धा व भक्ती भावाचे वातावरण निर्माण होणार आहे.
तसेच ऊर्स निमित्त बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून भाविकांच्या आगमना पर्यंत अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अन्नदान चा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम हाजी मलंग बाबा सेवा ट्रस्ट, देहूरोड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त नबी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे.
या पवित्र ऊर्स व संदल (पालखी) सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शांतता व सलोख्याच्या वातावरणात कार्यक्रम पार पडावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.




