सामाजिक

राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने प्रशांत जोगदंड यांचा गौरव

पुणे, १० फेब्रुवारी २०२६ (विशेष प्रतिनिधी) : साऊ ज्योती सामाजिक संस्था व श्लोक फाउंडेशन माता रमाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये देहूरोड (पुणे) येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लहू जोगदंड यांना “राज्यस्तरीय विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाजभूषण पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.


हा पुरस्कार रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ येथे झालेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामवंत शासकीय अधिकारी व चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.


माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणणे, सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देणे, तसेच सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविणे या कार्याची दखल घेत जोगदंड यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.


पुरस्कार स्वीकारताना प्रशांत जोगदंड यांनी हा सन्मान सर्व समाजकार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते व सत्यासाठी लढणाऱ्या सामान्य नागरिकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल देहूरोड परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button