देहूरोड

देहूरोड येथे हिंदी सक्ती माघारीच्या विजयाचा उत्साहपूर्ण उत्सव.

देहूरोड, दि. ०७ जुलै २०२५

महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मुंबईतील वरळी येथील विजयी सभेनंतर देहूरोड शहरातील सुभाषचंद्र बोस चौकात विजय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस (आय), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा आनंदोत्सव साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून झाली. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत सर्व उपस्थितांनी नागरिकांना पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी शिवसेना (उ.बा.ठा) मावळ तालुका सल्लागार रमेश जाधव, काँग्रेस मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर शेख, युवक काँग्रेसचे मलिक शेख,आणि मनसे तालुका नेते मोजेस दास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या उत्सवात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष मिक्की कोचर, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख संदीप बालघरे, युवा सेना मावळ तालुका सचिव विशाल दांगट,मनसेचे जॉर्ज दास, शिवसेनेचे देवा कांबळे,माजी शहर प्रमुख श्री. राजेश शेलार, बबनराव पाटोळे,विजय दांगट,सनी कदम, बाळासाहेब टोपे, पांडुरंग बालघरे, परशुराम दोडमणी,बाळासाहेब शेलार,मनसे कार्यकर्त्या अनिता मंगवाणी, डोमाणिक दास,दीपक भालेराव, सचिन चव्हाण,लखन दास, बाबू हिरमेटकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हा विजयोत्सव मराठी भाषेच्या सन्मानाचे आणि सर्वपक्षीय एकजुटीचे प्रतीक ठरला. कार्यकर्त्यांनी मराठीच्या रक्षणासाठी एकत्र लढण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button