चौत्रा पूना नाका गणेशोत्सव मंडळात अध्यक्षपदी रोहित सुरवसे, कार्याध्यक्षपदी शाबीर सय्यद यांची निवड.

वार्षिक बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर – सर्व गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग.
सोलापूर, दि. २१ जुलै २०२५
चौत्रा पूना नाका गणेशोत्सव मंडळाची सन २०२५-२६ या वर्षासाठीची वार्षिक बैठक श्री गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी रोहित सुरवसे, तर कार्याध्यक्षपदी मुस्लिम समाजाचे शाबीर अखिल सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श ठरलेली ही निवड सोलापूर शहरात कौतुकास पात्र ठरत आहे.
या बैठकीचे मार्गदर्शन मंडळाचे आधारस्तंभ पुरुषोत्तम बरडे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक हे सोलापूरमधील सर्वात सुंदर चौक आहे. त्याचे सुशोभीकरण १.७५ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आले आहे. तसेच आमदार विजय देशमुख यांनी अजून १.५ कोटींचा निधी मंजूर केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत लेझीम सराव, गणेश स्थापना ते अनंत चतुर्दशी मिरवणूकपर्यंतच्या संपूर्ण गणेशोत्सव कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: रोहित सुरवसे
कार्याध्यक्ष: शाबीर अखिल सय्यद
उपाध्यक्ष: राहुल कालेकर, जयदीप गायकवाड, सागर मुसमुसे, आकाश चव्हाण
सचिव: मल्लिनाथ टणके
सहसचिव: गणेश घोणे, स्वप्निल टिंगरे
खजिनदार: संदीप भोसले
सहखजिनदार: आकाश माने, प्रसाद चोरमुले
लेझीम प्रमुख: अजय अमनूर, शुभम महागावकर, अजय बाबर, समर्थ चव्हाण
मिरवणूक प्रमुख: महेश क्षीरसागर, राजेंद्र बोमरा, दत्तात्रय देशमुख, अझीम शेख, सचिन देवकते
पूजाप्रमुख: सोमनाथ पवार, नागेश धुत्तरगी, धनंजय माने
प्रसिद्धी प्रमुख: मारुती खानापुरे, राजू नकाते, गणेश तलवार, जगदीश शितोळे, समर्थ वाघचवरे
बैठकीदरम्यान श्री गणेशाची आरती संपन्न झाली. यानंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
बैठकीचे सुत्रसंचालन नितीन रुपनर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अर्जुन बरडे यांनी केले. मंडळातील सर्व सदस्य, माजी पदाधिकारी, व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




