पिंपरी न्यूज

फिरोज तांबोळी यांची लोकशाही युवा फाउंडेशनच्या पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्षपदी नियुक्ती.

पुणे, दि. २५ जुलै २०२५

लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने दलित, मुस्लिम, शोषित, आदिवासी, बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्य करणाऱ्या फिरोज लाला तांबोळी यांची पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहबुद्दीन मौलाली शेख यांच्या स्वाक्षरीने व अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मुद्दसिर मुजावर उपस्थित होते.
फिरोज तांबोळी यांना संविधान वाचवण्याच्या आणि समाजातील शोषित घटकांच्या हक्कांसाठी लढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

नियुक्ती पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, दलित, मुस्लिम व मागासवर्गीयां वरील अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरणे आणि सामाजिक एकोपा मजबूत करणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी कार्य करणे अपेक्षित आहे.

शहरात संघटनेचे कार्य प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करून लोकशाही युवा फाउंडेशनचे ध्येय धोरण पोहचवण्याची जबाबदारी तांबोळी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

लोकशाही युवा फाउंडेशनने त्यांना नवीन जबाबदारीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत आणि संघटनेच्या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

“मला लोकशाही युवा फाउंडेशनच्या पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही निवड केवळ सन्मान नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढवणारी आहे.

माझ्या कार्यकाळात मी मुस्लिम, दलित, शोषित व पिडीत घटकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. सामाजिक, शैक्षणिक आणि न्याय हक्कासाठी मी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे.

संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी संपूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करेन. युवकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना संविधानिक मूल्यांशी जोडणे, हा देखील माझा प्रमुख उद्देश राहील.

आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हा प्रवास यशस्वी होईल,अशी मला खात्री आहे. असे पुणे खबर प्रतिनिधी शी बोलताना फिरोज तांबोळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button