पिंपरी न्यूज

अकबर मुल्ला यांच्या मागणीनंतर प्रशासनाची तात्काळ दखल.

चिखलीतील बालघरे नगर, राजे शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना मिळणार मूलभूत सुविधा

पिंपरी चिंचवड दि. ३१ जुलै २०२५.
चिखली परिसरातील बालघरे नगर आणि राजे शिवाजीनगर येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यवस्थापन विभागाचे शहराध्यक्ष अकबर मुल्ला यांनी केलेल्या मागणीची प्रशासनाने त्वरित दखल घेतली आहे.

अकबर मुल्ला यांनी गट क्रमांक 754/755 मधील रस्त्यांची खराब अवस्था, नियमित साफसफाईचा अभाव, स्ट्रीट लाईट्सचा अभाव तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता या बाबींवर भर देत संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले होते.

या निवेदनाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या मुळे रस्त्यांची डागडुजी करण्यात आली,नियमित साफसफाई सुरू केले आहे. स्ट्रीट लाईट्स बसवणे व सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून मुलभूत सुविधांअभावी त्रस्त होते. मात्र अकबर मुल्ला यांच्या त्वरित पाठपुराव्यामुळे प्रशासन हलल्याने स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

“नागरिक कर भरतात, म्हणून त्यांना सुविधा मिळाल्याच पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button