भिमशक्ती पिंपरी चिंचवड शहर कमिटीमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे खबर दि.८ सप्टेंबर
पिंपरी चिंचवड : भिमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्यसभा खासदार तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहर कमिटीमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष सुरज चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते विविध पदांवर नियुक्तीपत्रांचे वाटप करून नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

या नव्या नियुक्त्यांमध्ये पुढील पदांचा समावेश आहे
प्रतिभा बनसोडे – युवती अध्यक्ष
अक्षय भैया कसबे – युवक प्रभारी
हरीशभाऊ डोळस – वरिष्ठ उपाध्यक्ष
गौतम लोंढे – प्रभाग अध्यक्ष (मोरे वस्ती शाखा)
वैशाली आठवले – युवती उपाध्यक्ष
क्रांती थोरात – युवती सचिव
या सोबतच इतर काही पदांवरही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. नियुक्तीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यासाठी निष्ठेने काम करण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला वरिष्ठ महिला नेत्या सरलाताई उपरवट, महासचिव महेश अरुण (पिंपरी चिंचवड शहर), युवक सचिव भिमराव समीनदर (पिंपरी चिंचवड शहर), युवक सचिव सुनील कांबळे (भोसरी विधानसभा) तसेच आदर्श गायकवाड, वैशाली थोरात, मीराताई गायकवाड, मीराताई थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बैठक संघर्ष बुद्ध विहार, भिमशक्ती नगर, मोरे वस्ती, चिखली येथे पार पडली. सुरुवातीला उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी बुद्ध वंदना करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
नियुक्त्यांबरोबरच संघटनेच्या आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच संघटनेचा प्रभाव अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीतून भिमशक्ती संघटनेच्या कार्याला नवे बळ मिळणार असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात संघटनेची ताकद अधिक दृढ होईल असा विश्वास शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांनी व्यक्त केला.




