सामाजिक
“दिवाळी पहाट” संगीतमय सदाबहार गीतांचा कार्यक्रम २ नोव्हेंबर रोजी

आकुर्डी प्रतिनिधी (दि.३० ऑक्टोबर २०२४)
एम. डी. चौधरी प्रस्तुत स्वरांजली आणि उदय काळे प्रस्तुत स्वर साधना कडून
“दिवाळी पहाट” या संगीतमय दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:४५ वाजता इ-एफ विंग वर्ल्ड ऑफ मदर, जय गणेश व्हिजन आकुर्डी येथे होणार आहे.
“स्वरांजली” निर्माता संयोजक रघुनाथ फणसे व “स्वर साधना” निर्माता संयोजक अनघा काळे आणि त्यांचे सहकारी हा कार्यक्रम सादर करतील. अशी माहिती एम. डी. चौधरी यांनी पत्रकाद्वारे दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. तरी सर्वांनी सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहून संगीतमय दिवाळी पहाट साजरी करुया.





