रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) देहूरोड शहर व विकास नगर-किवळे यांच्या वतीने संविधान दिन उत्साहात संपन्न.

पुणे खबर दि. २७ नोव्हेंबर २०२५
देहूरोड/विकास नगर-किवळे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) देहूरोड शहर व विकास नगर-किवळे यांच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने देहूरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि विकास नगर, किवळे येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
देहूरोड येथे मान्यवरांकडून अभिवादन.
देहूरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते लहू मामा शेलार आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटचे प्रशासक ॲड. कैलास पानसरे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विकास नगर, किवळे येथे संविधान वितरण
विकास नगर, किवळे येथील कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे आणि भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष मोहन राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सुमारे २५ संविधान ग्रंथांचे मान्यवरांना वितरण करण्यात आले, तसेच संविधानाच्या सुमारे पाचशे प्रास्ताविका (Preamble) प्रती उपस्थितांना वाटण्यात आल्या.

नानासाहेब डोईफोडे यांचे महत्त्वपूर्ण मनोगत
यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे म्हणाले की, “संविधान हा सर्वोत्तम ग्रंथ आहे. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे धार्मिक ग्रंथ असले तरी तुमचा व आमचा सर्वांचा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे संविधान.”
ते पुढे म्हणाले, “संविधानाचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. संविधान मध्ये बदल करण्याचा अधिकार प्रत्येक विद्यमान शासनाला/सरकारला दिला आहे आणि यापूर्वी अनेक वेळा संविधान मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे संविधान बदलण्याचा जो खोटा प्रचार आहे, तो सर्वांनी थांबवला पाहिजे.”
“भारत देश एका जाती-धर्माचा नसून तो विविध धर्मांचा व पंथां चा आहे. येथे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीची मुभा आहे. त्यामुळे हा लोकशाही देश आहे व तो लोकशाही देशच राहील,” असे मत त्यांनी ठामपणे मांडले.
मान्यवरांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या कार्यक्रमांना ॲड.कैलास पानसरे, लहू शेलार, ॲड. कृष्णा दाभोळे, आरपीआयचे नेते दिलीप कडलक, सुनील गायकवाड, अरविंद गायकवाड, इंद्रपाल रत्तु, बाळू जगताप, अशोक चव्हाण, धावारे क्लासेसचे संचालक बाळासाहेब धावारे, रवींद्र कदम, नानासाहेब डोईफोडे, मंडळाचे अध्यक्ष मोहन राऊत, सुधीर भाऊ साळुंखे, उमेश भाऊ सांडभोर, अनिल चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, राजेंद्र तरस, आरपीआयच्या नेत्या सुनीता चंदाने, गौतम गायकवाड, तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण जगताप, अशोक सोनवणे, रघु गव्हाळे, शुभांगी ताई वानखडे, सारिका सोनवणे, सुनीता मनोहरे, किरण कांबळे, मेघराज तंतरपाळे, शुद्धोधन वानखडे, देवराव ढोके, प्रज्वल वानखडे, राजाराम अस्वरे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन धर्मपाल तंतरपाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सिंधु तंतरपाळे यांनी केले.



