सामाजिक

प्रशांत जोगदंड यांच्या प्रयत्नांना यश – इंदुरी बुद्ध स्तूप मार्गावर सिमेंटचे काम प्रगतीपथावर

पुणे खबर दि. १३ जानेवारी २०२६
मावळ तालुक्यातील इंदुरी येथे असलेल्या प्राचीन बुद्ध स्तूपाकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंटचे पायऱ्यांचे काम सुरू करण्यात आले असून रस्त्याचा सुमारे अर्धा भाग पूर्ण झाला आहे. आधी या मार्गावर फक्त पाऊलवाट होती, गवतांमधून जाताना नागरिक, भाविक व पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.


या मार्गाच्या दुरवस्थेबाबत व स्तूपापर्यंत पोहोचण्यातील अडचणींबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लहू जोगदंड यांनी सातत्याने तक्रारी केल्या. त्यांनी सिमेंट रस्ता व पायऱ्या तयार करण्यासोबतच मार्गावर सूचना फलक लावण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून पुरातत्त्व खात्याकडून प्रशांत जोगदंड यांना अधिकृत पत्र मिळाले, ज्यात त्यांनी हे काम करण्याचे आश्वासन दिले होते.


सध्या डोंगर उतारावर सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या उभारण्यात आल्या असून या कामामुळे बुद्ध स्तूपाकडे जाणारा मार्ग अधिक सुरक्षित व सोयीस्कर झाला आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर भाविक व पर्यटकांना स्तूपापर्यंत सहज पोहोचता येईल, तसेच पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


नागरिक व बौद्ध समाजाकडून मागणी आहे की उर्वरित रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे आणि मार्गावर सूचना फलक व आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या पाहिजेत, जेणेकरून स्तूप परिसराचे संवर्धन आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button