देहूरोड

फुले,शाहू,आंबेडकर विचार मंचातर्फे धर्मपाल तंतरपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन.

किवळे, दि. २ जुलै २०२५

फुले,शाहू,आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष,धर्मपाल तंतरपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता भारतरत्न सोसायटी, दत्तमंदिर हॉल,विकास नगर, किवळे (धनश्री हॉटेल शेजारी) येथे एक भव्य सत्कार सोहळा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान आणि गरजूंना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात इयत्ता १०वी आणि १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल.तसेच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. नोटरी वकील,आणि डॉक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा हि सत्कार होणार आहे.
पावसाळ्यात काम करणाऱ्या महिला सफाई कामगारांना रेनकोट वाटप, विशेष क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंध फुटबॉल खेळाडूंचा सन्मान,बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच नेहमीच सामाजिक समता,शिक्षण,आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली मंचाने अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून,हा वाढदिवस सोहळा देखील त्याच दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभहस्ते सर्व सत्कार आणि वाटप संपन्न होणार आहे.
फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच च्या वतीने
या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आणि या सामाजिक उपक्रमाचा हिस्सा बनण्याचे आवाहन सिंधु तंतरपाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button