देहूरोड येथे ‘साथी सोशल फाउंडेशन’तर्फे १६ गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि शिष्यवृत्तीचे वाटप

“पुणे खबर”
सहसंपादक अशोक कांबळे,
देहूरोड: दि. २५ जून २०२६
शाळा शिकताना विद्यार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात किंवा त्यांना शाळा सोडावी लागते. हीच अडचण ओळखून, देहूरोड शहरातील मुस्लिम समाजातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना ‘साथी सोशल फाउंडेशन’* च्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अब्दुल करीम तांबोळी यांनी ‘पुणे खबर’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

रविवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजता, शितळानगर, देहूरोड येथील मोहम्मदिया मस्जिद येथे या विशेष मदत व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१० वी आणि १२ वीच्या १६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
या कार्यक्रमांतर्गत इयत्ता १० वी आणि १२ वीमधील एकूण १६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि २ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत थेट शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काळेवाडी येथील सिटी हॉस्पिटलचे डॉ. जावेद शेख उपस्थित होते. तसेच, मोहम्मदिया मस्जिदचे ट्रस्टी मौलाना अशरफ खान, हाजी अली शेख, हाजी मन्सूर सरदार, सोमाटणे फाटा येथील हॉटेल महाराष्ट्रचे हाजी आसिफ शेख, अमिर अत्तार, मौलाना नईम, हाजी जब्बार खान आणि डॉ. नजीर तांबोळी बाबू रज्जाक शेख या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
सामाजिक कार्याचा वसा पुढेही सुरू राहणार: हाजी अब्दुल करीम तांबोळी*
“यापूर्वीही मी संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना आरोग्य सेवा आणि शैक्षणिक मदत पुरवली आहे. समाजात सतत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, यापुढेही माझे हे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू राहील.”
— हाजी अब्दुल करीम तांबोळी (अध्यक्ष, साथी सोशल फाउंडेशन)फाउंडेशनच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे देहूरोड परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांमधून संस्थेचे विशेष आभार मानले जात आहेत.
निर्भीड व निष्पक्ष खबर – “पुणे खबर”
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : ७०३८७२९३४३
संपादक : रज्जाक साहेबलाल शेख.
सहसंपादक:- अशोक कांबळे,





