प्रबुद्धरत्न आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे निधन;धम्मचळवळीचा दीप विझला.- के एच सूर्यवंशी

देहूरोड: प्रतिनिधी
ज्येष्ठ प्रबुद्ध साहित्यिक आणि ‘प्रबुद्धरत्न’ पुरस्काराने सन्मानित आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील एक मार्गदर्शक विचारवंत आणि निष्ठावान साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.धम्मभूमीशी ३२ वर्षांचे अतूट नातेआचार्य सोनग्रा आणि ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड यांचा स्नेह १९९३ पासूनचा होता. बुद्ध विहार कृती समितीचे तत्कालीन सरचिटणीस के. एच. सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रथम देहूरोड येथे आले होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे ते अल्पावधीतच धम्मभूमीचे हक्काचे प्रवक्ते बनले. राष्ट्रसंत प्रबुद्धरत्न रामदास महाराज पंढरपूरकर आणि कवी बादशहा सय्यद यांच्यासोबत त्यांची मैत्री धम्मभूमीवरील प्रत्येक कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून निश्चित असायची.रमाई विद्यार्थी संकुलाशी जिव्हाळाशितळानगर, देहूरोड येथे अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी उभारल्या जाणाऱ्या ‘रमाई विद्यार्थी संकुला’शी सरांचे भावनिक नाते होते. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी ते आजारपणातही सक्रिय होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकाश कांबळे रुईकर लिखित पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते धम्मसदन येथे आले होते, तीच त्यांची धम्मसदनला दिलेली शेवटची भेट ठरली.साहित्यातून विचारांचा वारसासरांनी आपल्या लेखणीतून समाजाला वैचारिक शिदोरी दिली. त्यांचे आत्मचरित्र ‘सोनजातक’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील ‘मैत्रेय बुद्ध’ हे ग्रंथ विशेष गाजले. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः लिहिलेल्या १२ पुस्तकांचा संच पुण्यातील तब्बल २५० बुद्ध विहारांना मोफत वाटप करून एक नवा इतिहास घडवला.अखेरचा सन्मानत्यांच्या प्रकृतीची खालावलेली अवस्था पाहता, २० डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृती दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी त्यांना गौरवण्यात आले होते.के. एच. सूर्यवंशी, विठ्ठल गायकवाड आणि धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. “असा प्रबुद्ध साहित्यिक पुन्हा होणे नाही,” अशा शब्दांत सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.





