Uncategorized

एम. डी. चौधरी यांना नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय मानव रत्न पुरस्कार’ने सन्मानित.

पुणे खबर दि. ११ डिसेंबर २०२५

नवी दिल्ली: जागतिक मानवाधिकार दिनाचे (१० डिसेंबर) औचित्य साधून नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन (नवीन) येथे देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी, ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांना त्यांच्या मानवी हक्कांच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेऊन ‘राष्ट्रीय मानव रत्न पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.


हा महत्त्वाचा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, यामध्ये एम. डी. चौधरी यांचा समावेश आहे. त्यांच्या मानवाधिकार क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button