होली एंजल इंग्लिश स्कूलमध्ये लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न.

पुणे खबर दि. १२ डिसेंबर २०२५
अमित जाधव (दिवा प्रतिनिधी)
(मुंबई दिवा) : मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना वेळीच लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने, दिव्यातील होली एंजल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज येथे नुकतेच टेटानस (Tetanus) वॅक्सीन कॉम्पिटिशन लसीकरण मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये १० ते १२ वर्षे वयोगटातील तसेच १६ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टिटॅनसची लस देण्यात आली. शाळेतील शंभरपेक्षा अधिक मुलांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.

या उपक्रमाला पालकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. लसीकरणाचे महत्त्व काय आहे आणि ही लस का घ्यावी, याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने पालक आणि विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी शाळेतर्फे वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.
या लसीकरण मोहिमेत शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.




