Uncategorized

दिवा शहरात मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन आणि रूट मार्च!

अवैध कारवायांवर कारवाई; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोहिम.

पुणे खबर दि. १२ डिसेंबर २०२५
(प्रतिनिधी अमित जाधव)
ठाणे, दिवा: मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत दिवा पोलीस चौकीच्या हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे (कळवा विभाग, ठाणे) यांच्या उपस्थितीत दिवा शहर परिसरात (११ डिसेंबर) रोजी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) आयोजित करण्यात आले होते.

या मोहिमेमुळे गुन्हेगार आणि अवैध कारवाया करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोम्बिंग ऑपरेशनची माहिती:
सदर कोम्बिंग दरम्यान राजू पाचोरकर, पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन यांच्यासह 5 पोलीस अधिकारी, 31 अंमलदार, RCP (दंगल नियंत्रण पथक) आणि गोपनीय अंमलदार रवि सातपुते हे उपस्थित होते.

  • या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एकूण 23 आरोपींना चेक करण्यात आले.
  • कारवाईचा तपशील:
  • महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे – 01 कारवाई
  • महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (क) प्रमाणे – 01 कारवाई
  • महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई प्रमाणे – 02 कारवाई
  • कोफ्ता ॲक्ट 1 तसेच 33 W 131 प्रमाणे – 01 कारवाई
    रूट मार्चचे आयोजन:
    कोम्बिंग ऑपरेशननंतर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस पथकाने शहरभर रूट मार्च (Route March) काढला.
  • रूट मार्चचा मार्ग: दिवा पोलीस चौकी ते गणेश नगर – गणेश पाडा – दातिवली स्टेशन – दातिवली स्मशानभूमी – श्लोक नगर – दिवा रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म नंबर 08 – रिलायन्स टॉवर – मुंब्रादेवी कॉलनी – दिवा रेल्वे स्टेशन – साबेगाव – भगतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा.
    पोलिसांच्या या कारवाईमुळे दिवा परिसरातील अवैध धंद्यांना आणि गुन्हेगारी वृत्तीला आळा बसण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button