पुणे न्यूज

पुणे येथे राज्यस्तरिय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा २०२५ थाटात संपन्न.

पुणे, १८ नोव्हेंबर २०२५ –

HWPL पीस डिपार्टमेंट इंडिया (HWPL 05) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यातील मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघातून प्रमुख पाहुणे म्हणून व्हिक्टोरिया मुत्तुम, दिल्ली हेड, पीस डिपार्टमेंट, HWPL 05 इंडिया
वैभव गिते, सचिव, NDMJ महाराष्ट्र राज्य
राहुल मोरे, सहआयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य सुचेता शिंदे, उपजिल्हाधिकारी, सभांजी नगर दीपक चौने, उपसंचालक, शिक्षण, पुणे विभाग
रावसाहेब मिरगणे, शिक्षण निरीक्षक, पुणे विभाग
डॉ. घनशाम भोसले, अध्यक्ष, दलित पँथर, महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभली.या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवडलेल्या ४४ गुणवंत शिक्षकांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.व्हिक्टोरिया मुत्तुम यांनी आपल्या भाषणात शिक्षकांना संबोधित करताना म्हटले,
“जगात खरी मानवता आणि विश्व शांती प्रस्थापित करायची असेल तर ती शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पीस एज्युकेशन देऊनच शक्य आहे. शांतताप्रिय नागरिक घडवण्यासाठी सर्वप्रथम शिक्षकांनीच HWPL चे पीस एज्युकेशन ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. शांतीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले तरच खरा शांतता दूत घडेल.”यावेळी शिक्षकांना आपल्या पवित्र कार्यात येणाऱ्या अडचणी, शिक्षकांचे न्याय हक्क आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षक संघटना त्यासाठी कशाप्रकारे झटत आहे, यावरही मान्यवरांनी आपली मते मांडली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गायकवाड (अध्यक्ष),
सत्यजित जानराव (सरचिटणीस),
नईम इनामदार (संघटक),
सोमनाथ शिंदे (उपाध्यक्ष),
सुरेश रोकडे, उत्कर्ष मोरे (तंत्रशिक्षण विभाग),
पंडित राजगुरू, दीपक गवळी आदींनी अथक परिश्रम घेतले.

शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान आणि शांततेच्या संदेशाचा प्रसार करणारा हा सोहळा राज्यातील शिक्षक बांधवांसाठी प्रेरणादायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button