‘मतभेद विसरून संघटित व्हा, तरच समाजाचा विकास होईल’ – पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे प्रतिपादन.

पुणे खबर दि. १७ डिसेंबर २०२५
देहूरोड (प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा (दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत देहूरोड शाखेच्या वतीने आयोजित ‘उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास’ देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे आणि उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे यांनी ‘धम्म सदन’ येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

शिबिरार्थींकडून पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान
धम्म सदन येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षण शिबिरादरम्यान शाखा पदाधिकारी आणि उपासिका शिबिरार्थींच्या हस्ते पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे व उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे यांचा पंचशील आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

उपस्थित बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना विक्रम बनसोडे म्हणाले की, “आपल्यातील वैयक्तिक मतभेद विसरून सर्वांनी संघटित होणे काळाची गरज आहे. जेव्हा आपण एकत्रितपणे कुनीतीवर मात करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वतःचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास होईल.” त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्व शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या वतीने बुद्धमूर्ती वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच,धम्मसदन येथील गरजू विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या निवासी वसतिगृहाबद्दलचे माहिती पत्रकही पोलीस प्रशासनास देण्यात आले.
या कार्यक्रमाला
- अध्यक्ष: प्रकाश कांबळे
- सरचिटणीस: राकेश आवाड
- कोषाध्यक्ष: मोहन शिंदे
- उपाध्यक्ष: उत्तम हिंगे (संस्कार), सुदाम पवळ (पर्यटन)
- धम्मभूमी सामाजिक संस्था: के. एच. सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष), अमोलभाऊ नाईकनवरे (कार्याध्यक्ष) तसेच रोहन गायकवाड, अनुकूल गायकवाड (पर्यटन सचिव), सुनील कांबळे. पुष्पा कांबळे, निलम काकडे, आशा माने, आशा गायकवाड, संगिता गायकवाड. आणि देहूरोड शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




