मुंबई

दिवंगत पत्रकार संजय बोर्डे यांच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

पुणे खबर वृत्तसेवा

४ जानेवारी २०२५

मुंबई प्रतिनिधी – आंबेडकरी चळवळीचे तरुण तडफदार पत्रकार आणि रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय बोर्ड यांचे नववर्षा च्या प्रारंभी १ जानेवारीला हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत संजय बोर्डे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.कांदिवली पूर्व दामुनगर येथील नालंदा बुद्ध विहारात ना.रामदास आठवले यांनी दिवंगत संजय बोर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दिवंगत संजय बोर्डे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष मजबुतीने उभा राहील.त्यांच्या मुलास ऋषिकेश बोर्डे यांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button