मयुर पिंजण यांचा वाढदिवस व दिवाळी निमित्त देहूरोड येथे फराळ वाटप.

पुणे खबर डिजिटल मिडिया.
देहूरोड, दि. २२ ऑक्टोबर २०२५
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख मयुर पिंजण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सणासुदीच्या दिवाळीच्या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा म्हणून देहूरोड येथील माई बाल भवन तसेच परिसरातील गोरगरीब नागरिकांना शिवसेना आणि युवा सेना यांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमातून पक्षाने दिवाळीच्या सणात सर्वांना आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी देहूरोड शहर प्रमुख संदीप बालघरे, शहर संघटक बाळासाहेब दिवसे, उपशहर प्रमुख सनी कदम, उपशहर प्रमुख विजय दांगट, उपशहर प्रमुख विलास हिनकुले, शहर सल्लागार गणेश सावंत, विभाग प्रमुख रमेश जाधव,अरुण गोंटे, विशाल दांगट यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमातून शिवसेनेने ‘दिवाळीच्या प्रकाशात सर्वांचे जीवन उजळावे’ असा संदेश दिला. फराळ वाटपाद्वारे समाजातील गरजू लोकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन आणि नियोजन यामुळे स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सणासुदीच्या काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले. हा उपक्रम समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून, दिवाळीच्या सणात प्रेम, एकता आणि सौहार्दाचा संदेश देणारा ठरला आहे.



