तळेगाव दाभाडे

सचिन शेळके मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकीचे दर्शन.

वाहतूक पोलीस आणि ट्रफिक वॉर्डनना ‘थंडीपासून संरक्षण’ देणाऱ्या जॅकेट चे वाटप.

पुणे खबर दि. २० डिसेंबर २०२५
तळेगाव दाभाडे:

येथील कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग शाखेच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आणि वॉर्डनना सचिन शेळके मित्र मंडळाच्या वतीने हिवाळी जर्कीन (जॅकेट) वाटप करण्यात आले. वाढत्या थंडीपासून पोलिसांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय शेळके यांनी दिली.
या कार्यक्रमाला तळेगाव वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गणेश लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना जॅकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय शेळके, ज्येष्ठ पत्रकार दिलीप डोळस, शशिकांत चव्हाण, प्रसाद शेळके, गणेश अंभोरे यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतूक पोलीस भर उन्हात, पावसात आणि आता कडाक्याच्या थंडीतही रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करत असतात. या कर्तव्याची दखल घेऊन सचिन शेळके मित्र मंडळाने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

“पोलीस कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी जॅकेट वाटपाचा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे.”
— संजय शेळके सामाजिक कार्यकर्ता

या मदतीबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकारी गणेश लोंढे यांनी मंडळाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button