मावळ तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

तळेगाव, दि. १० जुलै २०२५
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मावळ तालुक्यातील तळेगाव येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मावळ तालुका अध्यक्ष नितीन मारुती ओव्हाळ यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले. त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या औचित्याने उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.या मार्गदर्शनात बौद्ध धम्माचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि सामाजिक समता यावर चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी,मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, महासचिव लहू लोखंडे , तालुका उपाध्यक्ष सुनील वाघमारे ,मावळ तालुका युवा अध्यक्ष संदीप कदम, मावळ तालुका महिला अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, महासचिव हर्षदा गजरमल ,वडगाव शहर उपाध्यक्ष पवन उदागे.
याशिवाय भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी बौद्ध धम्माच्या तत्त्वांचा प्रसार आणि सामाजिक जागरूकता वाढवण्याचा संकल्प केला. हा कार्यक्रम मावळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्याला बळ देणारा ठरला.


