महाराष्ट्र

समाजसेवेचा ध्यास आणि वंचितांचे कैवारी: ‘मुस्लिम वेल्फेअर’चे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

​’मुस्लिम विकास विचार मंच’चे अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख यांच्याकडून गौरव पर शुभेच्छा.

​(वाढदिवस विशेष) 23/12/2025
मुंबई (महाराष्ट्र): मुस्लिम समाजातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारे, अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आणि समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध असणारे ‘मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन’ चे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांचा वाढदिवस आज दि. २३ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘मुस्लिम विकास विचार मंच’चे अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख यांनी सलीम सारंग यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

सलीम सारंग यांनी केवळ पदाचा वापर न करता, जमिनीवर उतरून काम करण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. मुस्लिम समाजातील शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ‘मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन’च्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर मोठी चळवळ उभी केली आहे. त्यांच्या याच कार्याला पाठबळ देत, रज्जाक साहेबलाल शेख यांनी “सलीम सारंग हे समाजाचे दीपस्तंभ असून त्यांचे नेतृत्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.


समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय झाल्यास, तिथे सर्वात आधी धावून जाणारे नेतृत्व म्हणून सलीम सारंग यांची ओळख आहे. केवळ प्रश्न मांडणेच नव्हे, तर ते तडीस नेऊन संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या या निस्वार्थ कार्यामुळेच आज केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर सर्वधर्मीय स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.


केवळ मदतीचा हात न देता, समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी त्यांनी शिक्षण आणि रोजगाराच्या संदर्भात मोठी जनजागृती मोहीम राबवली आहे. अशी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना रज्जाक साहेबलाल शेख यांनी सदिच्छा व्यक्त केली . “अल्लाह सलीम सारंग साहेबांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा अशीच निरंतर सुरू राहो.”


​वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button