मुंबई

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनकडून रु. १,५१,०००/- चा मदत निधी मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्द.

पुणे खबर ७ ऑक्टोबर
(मुंबई/प्रतिनिधी)

सोलापूर आणि मराठवाडा परिसरातील पूरग्रस्तांसाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने जमा केलेला रु. १,५१,०००/- चा मदत निधी आज, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्द करण्यात आला.

या उपक्रमाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी केले. निधी संकलन मोहिमेत संघटनेच्या महिला सदस्यांनी विशेष उत्साहाने सहभाग घेतला. अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी योगदान दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या सामाजिक कार्याचे आणि विशेषतः महिला सदस्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, “महिलांचा असा सहभाग समाजात संवेदनशीलता, एकता आणि जबाबदारीचा आदर्श निर्माण करतो.” सलीम सारंग यांनी सांगितले की, “मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन नेहमीच जनसेवा आणि राज्याच्या विकासासाठी तत्पर राहील. संकटकाळी समाजाच्या पाठीशी उभे राहणे हीच आमची ओळख आहे.” या प्रसंगी संघटनेच्या आयशा खान, मुस्कान शेख यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button