सोलापूर

शाळेतील आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक ३ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.

पुणे खबर वृत्तसेवा दि.१० जानेवारी २०२५

सोलापूर :- महानगरपालिका प्रशाला क्रमांक ३ मध्ये माजी विद्यार्थी रमले.निमित्त होते माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे.पुन्हा शाळेत यावे, वर्गात बसावे,मित्र मैत्रिणी भेटावे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभावे या उदात्त हेतूने नुकतेच सोलापूर महानगरपालिका प्रशाला मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा बुधवार, ८ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

शाळा सोडून २५ वर्ष झालेल्या वर्ष २००० बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. या मेळाव्यास अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक पुरस्कृत, प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका आशालता हणमंतु जगताप होते.प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शिक्षक भीमसेन निवृत्ती शिंदे,वरिष्ठ शिक्षक शंकर मेघू राठोड,वरिष्ठ शिक्षिका कल्पना रूपसेन सालेगांवकर,सोलापूर महानगरपालिका उर्दू कॅम्प प्रशाला मुख्याध्यापक हारून बंदूकवाले,स्वाती बायस,जय भवानी प्रशाला सोलापूर मुख्याध्यापक हरिदास झाडकर,नागेश शहाणे,प्रकाश कांबळे,मुख्याध्यापक श्रीमती सुशिलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव मुकुंद चंदनशिवे,रोहिणी साळुंखे,रवी बिराजदार सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक ३ मुख्याध्यापक धनराज गणपत तळेकर,सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक ६ मुख्याध्यापिका अश्विनी भानुदास लांबतुरे उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा माध्यमातून शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात समस्त मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.  सर्व विद्यार्थ्यांनी आपले जुने दिवस आठवून,तसेच मित्रांच्या सानिध्यात मनसोक्त मौजमजा करून आपले लहानपणीचे दिवस आठवले व हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील अश्या भावना प्रगट केल्या.मनोरंजनात्मक गेम व रुचकर भोजनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. पुन्हा एकमेकांना भेटू या भावनेने,पाणावलेल्या डोळ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन एकमेकांना निरोप दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन बक्तार गफूर शेख,व सरोज हंचनाळ यांनी केले होते कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी सचिन शिरसागर,कासिम महसूलदार,सतीश नंदाल,दत्ता जाधव,श्रीनिवास राळगोड्डी,आनंद कळसकर,योगेश क्षीरसागर,प्रसाद पद्मा,प्रशांत गड्डम,शिवराज कांबळे, मार्कंडेय परमेला,राजकुमार श्रावंतुल यांनी अथक प्रयत्न केले. सुत्रसंचलन शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button