भारतामध्ये होणाऱ्या अंध महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी माई बाल भवनच्या चार मुलींची निवड.

पुणे : (रज्जाक शेख)
दि.२२ ऑगस्ट २०२६
केरळ येथे २ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या अंध महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी माई बाल भवन संस्थेच्या मुलींनी मोठे यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र संघातील ५ खेळाडूंना केरळ येथे झालेल्या तीन दिवसांच्या निवड शिबिरासाठी बोलावण्यात आले होते. या शिबिरातून कोमल गायकवाड, दीपाली कांबळे व हर्षदा काळभोर या माई बाल भवनच्या खेळाडूंची भारतीय राष्ट्रीय संघामध्ये निवड झाली असून स्वाती माने हिची राखीव संघात निवड झाली आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी माई बाल भवन संस्थेसाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. खेळाडूंच्या कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनामुळे मिळालेले हे यश भविष्यात अनेकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.
संस्थेच्या संस्थापिका प्रतिज्ञा देशपांडे (माई) यांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ असल्याचे मधुकर इंगळे यांनी पुणे खबर प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले.
या सर्व खेळाडूंना पुणे खबर वृत्त वाहिनीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!




