स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने परभणी येथील घटनेचा तीव्र निषेध.

वडगाव प्रतिनिधी दि.१२ डिसेंबर
परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना, तोडफोड केल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

तसेच देशद्रोह कृत्य करणाऱ्या देशद्रोही दत्ता सोपान पवार याला राजद्रोहाची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संलग्न रिपब्लिकन कष्टकरी शेतकर संघटना यांच्या वतीने करण्यात आली. तसेच परभणी जिल्हा मधील आंबेडकरी जनतेचे व कार्यकर्त्यांचे चालू असलेले कोंबिंग ऑपरेशन हे तात्काळ थांबवण्यात यावे.अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे म्हणाले .

यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा पुणे जिल्हा अध्यक्ष समाधान सोनवणे,मावळ तालुका अध्यक्ष सागर वाघमारे,मावळ तालुका संघटक पॅंथर अक्षय कांबळे,सामाजिक कार्यकर्ते नितीन निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. वंदे मातरम्, भारत माता की जय,भारतीय संविधानाचा विजय असो, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.


