सामाजिक

‘इनक्रेडीबल समाज सेवक ग्रुप’ चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

(पुणे प्रतिनिधी दि: १९ डिसेंबर)

१८ डिसेंबर या ‘अल्पसंख्याक दिवस’ निमित्त अल्पसंख्यकांच्या विविध हक्कांच्या मागण्यासाठी ‘इनक्रेडीबल समाज सेवक ग्रृप’ तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले,आणि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी ‘इनक्रेडीबल समाज सेवक ग्रुप’ चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, गुलशन शेख,मुक्तार अन्सारी,असिफ बागवान,सचिन आल्हाट,राजू सय्यद, इब्राहिम शेख आदि उपस्थित होते.

अल्पसंख्यकांना भारतीय संविधान नुसार हक्क आणि अधिकार प्राप्त असून ते अधिकार आणि हक्क सर्व अल्पसंख्याकापर्यंत पोहोचावे तसेच केंद्र, राज्य, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी योजनेचा लाभ अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचावा,’मार्टि ‘संस्थेच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक समिती गठित करण्यात यावी या मागण्यांकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून इनक्रेडीबल समाज सेवक ग्रृप तर्फे निवेदन देण्यात आले.

पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयातील अल्पसंख्याक विभागाचे नायब तहसीलदार इंदुलकर यांनी हे निवेदन स्वीकारले.तसेच पुण्यातील शिक्षण अधिकारी तथा पुणे विद्यापीठ मार्फत संपूर्ण जिल्ह्यात अल्पसंख्याक दिवसाचे उपक्रम राबविण्याचे आश्वासन देखील या वेळी अल्पसंख्याक विभागाने यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button