Uncategorized

तळेगाव दाभाडे येथे महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व सरकारी कर्ज योजनांचे मार्गदर्शन.

पुणे खबर वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, दि. १६ जून २०२५

इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ,आणि स्किल हब एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जानवी एंजल्स संस्थेच्या सहकार्याने आज एका खास उपक्रमाचे आयोजन तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महिलांना व्यवसाय प्रशिक्षण आणि सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या कर्ज सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाने अनेक महिलांमध्ये उद्योजक बनण्याची जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण झाला.


कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे. “आम्ही चांगल्या उद्योजिका होऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावू आणि स्वतःचे आत्मनिर्भर जीवन निर्माण करू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सरकारी योजनांबाबत मिळालेल्या माहितीमुळे त्यांना आर्थिक सक्षमीकरणाची दिशा स्पष्ट झाली.
या कार्यक्रमात स्किल हाफ एज्युकेशन चे आशिष शिंदे, राहणे,भूषण वर्धे आणि अश्विनी शिंदे यांनी उपस्थित राहून महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच,जानवी एंजल्स संस्थेचे मार्गदर्शक संतोष लोखंडे व संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्ष वृषाली वीरगुर्जर,उपाध्यक्ष रूपाली जाधव, कार्याध्यक्ष सुरेखा सरोदे, सभासद प्रणाली आगळे, रोहिणी आणि सभासद नवनाथ बेनगुडे, सुनिता कदम यांनी मोलाचे सहकार्य करत उपस्थित महिलांना प्रोत्साहन दिले.


हा उपक्रम महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची जाणीव निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरला. अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळते,असे सविता लोखंडे, सारिका बोरकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button