महात्मा गांधी विद्यालयात ‘शाळा प्रवेशोत्सव’ अंतर्गत उत्साहात स्वागत

पुणे खबर वृत्तसेवा दि.१८ जून २०२५
राजगुरुनगर, : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमाअंतर्गत उत्साहात स्वागत करण्यात आले.

सकाळ व दुपार अशा दोन सत्रात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळ सत्रात इ.८ वी ते १० वी तर दुपार सत्रात इ. ५ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
सकाळ सत्रात स्वागतासाठी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका रेखा क्षोत्रिय, संचालक राहुल कुंभार, दुपार सत्रात संचालक प्रदीप कासवा, गणेश घुमटकर, स्वानंद खेडकर, प्राचार्या संध्या कांबळे उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका रेखा जाधव, सुनीता ठाकूर, पर्यवेक्षक सोपान निसरड, हौशीराम मुठे, लतीफ शाह, पालकवर्ग, अध्यापक वर्ग उपस्थित होता.

ढोल, ताशा, लेझिम वाजवून मुलांचे स्वागत करण्यात आले. संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे अधिकारी यांनी मुलांना पेन वाटप केले. विद्यालयातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींचे फलक तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता.
नवप्रवेशित विद्यार्थी व पालकांच्या स्वागतासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका रेखा जाधव यांनी प्रास्ताविक केले. संचालिका रेखा क्षोत्रिय, संचालक प्रदीप कासवा यांनी संस्थेच्या वतीने स्वागत केले.

यावेळेस दहा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठपुस्तके वितरण करण्यात आले. अर्चना गोडसे, तुळशीराम घोलप यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका सुनीता ठाकूर यांनी आभार मानले.



