देहूरोड शहरात राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी.

देहूरोड प्रतिनिधी
पुणे खबर दि.१३ जानेवारी २०१५
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर शाखा महिला व पुरुष कार्यकारिणी यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती धम्म सदन शितळानगर देहूरोड येथे रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी जयंती साजरी करण्यात आली.

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा अध्यक्ष संजय आगळे होते. प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण उपाध्यक्ष आशा गायकवाड उपस्थित होत्या,याप्रसंगी राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांनी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली,


सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने समता सैनिक दलाच्या सैनिक प्रीती प्रकाश कांबळे यांनी मी “सावित्रीबाई फुले बोलतेय” एकपात्री प्रयोग करून खऱ्या अर्थाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर उपस्थित महिला पदाधिकारी देहूरोड शाखा महिला अध्यक्षा पुष्पा कांबळे आशा माने पुष्पा सोनवणे संजीवनी चव्हाण संगीता बनसोडे शिल्पा शेंडे,समता सैनिक दलाचे सैनिक आप्पासाहेब वाघमारे प्रकाश कांबळे रुईकर शकुंतला आगळे,छाया शिंदे,नीलम काकडे,दिशा कांबळे व देहूरोड शाखा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, अध्यक्षीय भाषणात संजय आगळे म्हणाले राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला दिलेले संस्कार खऱ्या अर्थाने प्रत्येक आईने आपल्या मुलांना देण्याची गरज आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना दिलेली शिकवण याची कृतज्ञता अंगीकार करणे व देशात समानता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आव्हान केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार सचिव राकेश आव्हाड यांनी केले, शेवटी आभार कोषाध्यक्ष सु.भा.पवळ यांनी व्यक्त केले.




