जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

(दि.५ जून २०२५)
देहूरोड – शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून २०२५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमात स्थानिक नागरिक,आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनेक झाडे लावण्यात आली, ज्यामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होईल. या उपक्रमाचे आयोजन डॉ.श्रीनिवास चाटे यांनी केले होते.

पर्यावरण संवर्धन म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे जतन, संरक्षण आणि त्यांचा शाश्वत वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे.यामुळे जैवविविधता, हवामान स्थिरता आणि मानवी जीवनाची गुणवत्ता टिकवून ठेवता येते.पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकार किंवा संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक व्यक्तीची कर्तव्य आहे. छोट्या-छोट्या कृतींमधून, जसे की वृक्षारोपण,पाणी बचत आणि पुनर्चक्रण, करुन आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.असे डॉ श्रीनिवास चाटे म्हणाले.






