देहूरोड

देहूरोड शहरातील विविध संस्थांकडून महामानवास अभिवादन.

पुणे खबर दि. ७ डिसेंबर २०२५
(देहूरोड – प्रतिनिधी)

विश्वरत्न, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देहूरोड शहरभरात विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने महामानवास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यामध्ये भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला कार्यकारिणी, समता सैनिक दल, धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था, वंचित बहुजन आघाडी, बुद्ध विहार ट्रस्ट आणि देहूरोड येथील अन्य विविध संघटनांनी सहभाग घेतला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुष्पा कांबळे,आशा गायकवाड, पुष्पा सोनवणे, छाया शिंदे, संजिवनी चव्हाण,शिल्पा शेंडे आणि अन्नु साळवे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.
के. एच. सूर्यवंशी, ॲड. अशोक रुपवते, परशुराम दोडमणी, मोहन शिंदे, सु. भा. पवळ, विशाल चव्हाण यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने महामानवास मानवंदना (सॅल्यूट) देण्यात आली.
पुतळ्याजवळ अभिवादन झाल्यानंतर ऐतिहासिक बुद्ध विहार, धम्मभूमी देहूरोड येथील बुद्ध मूर्तीस व भारतातील चैत्यभूमी दादर नंतरचे एकमेव द्वितीय अस्थि स्तूपास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमास देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, तसेच सुनील कांबळे, सुरेश भालेराव, करीम शेख, दादू गायकवाड, कुलदीप शिंदे, प्रकाश अदमाने, एस. के. यादव, बी. बी. राजगुरु, डी. एस. मोरे यांच्यासह विविध संस्था व संघटनेचे आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button