देहूरोड
देहूरोडमध्ये इस्टर उत्सव उत्साहात साजरा

पुणे खबर दि. ५ एप्रिल २०२६
देहूरोड : येथील विकास नगरमधील सेंट जोसेफ मलंकारा सिरियन कॅथोलिक चर्च येथे इस्टर सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी फादर विबिन राज यांनी विशेष इस्टर प्रार्थना अर्पण करत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. चर्च परिसरात पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली असून, या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला.

फादर विबिन राज यांनी शांततेचा आणि बंधुभावाचा संदेश देत सर्वांना इस्टरच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ट्रस्टी जोसे एम. बेबी, सचिव जिजो मॅथ्यू, ब्र. मॅथ्यू तसेच पॅरिश सदस्य आणि अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सवाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला.



