देहूरोड

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम; १५० महिलांना शिरखुर्मा साहित्य वितरण

पुणे खबर दि. १९ मार्च २०२६
देहूरोड : प्रतिनिधी

श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील विधवा व गरजू १५० महिलांना शिरखुर्मा साहित्याचे किट वाटप करण्यात आले. देहूरोड येथील जामा मस्जिद येथे दि. १९ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

निराधार विधवा मुस्लिम महिलांना रमजान ईद सण आनंदाने साजरा करता यावा, या उद्देशाने शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे किट ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी रमजान ईदचे महत्त्व व विशेष माहिती उपस्थितांना सांगितली. रमजान महिन्यातील उपवास, संयम, दानधर्म आणि बंधुभाव यांचे महत्त्व त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अंनिस शेख,संजय पिंजण, रमेश जाधव, गफूर शेख,अमित छाजेड, रफिक शेख, इंद्रपाल सिंग रत्तू, रमजान शेख, विजय पवार, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, रज्जाक शेख, चंद्रशेखर पात्रे व विविध सामाजिक कार्यकर्ते, ट्रस्टचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button