सामाजिक

भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्षपदी डॉ अमर चौरे यांची नियुक्ती

कामशेत दि.२५ ऑक्टोबर

डॉ.अमर चौरे यांची भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. २३ वर्ष धम्म सेवा करणारे कोरोना काळात ४०० विवाह,लग्न विधी लावनारे मावळ तालुक्याील प्रत्येक गावात दांडगा संपर्क असणारे बौध्दाचार्य विपश्यना साधक धम्म प्रचारक अमर चौरे यांना समाज भुषण पुरस्कार,महाराष्ट्र आयकॉन समाज रत्न, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार, धम्मरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे त्यांची मावळ तालुका अध्यक्ष पदी जाहीर निवड करण्यात आली.

सागर वाघमारे यांची सरचिटणीस पदी तर उपाध्यक्षपदी संदीप कदम यांची निवड करण्यात आली. नव नियुक्त पदाधिकारी यांना के बी मोटघरे चेअरमन ट्रस्टी धाईंजे संदीप गायकवाड नामदेव इंगळे गुरूजी रोहीनी वनशिव अंजली सरोदे स्वाती भालेराव रंजना चोपडे राजू शिंदे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले,भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका वर्षावास, बुद्ध वंदना ,सुत्यपठण धम्मदेसना असे विविध कार्यक्रम चे आयोजन कामशेत माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट ऑफीस मध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी प्रमूख मार्गदर्शन चेअरमन ट्रस्टी के बी मोटघरे यांनी केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष धाईजे होते. सूत्रसंचालन संदीप गायकवाड यांनी केले, शेवटी आभार माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button