देहूरोड

सूर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

देहूरोड दि. १२ डिसेंबर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती देहूरोड येथे उत्साहात संपन्न,भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर शाखा पुरुष व महिला कार्यकारणी समता सैनिक दल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड) येथे समता सैनिक दलाचे पुणे जिल्हा प्रमुख तथा लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली व भैय्यासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणाही दिल्या.

भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखेचे अध्यक्ष संजय आगळे,महिला अध्यक्षा पुष्पा कांबळे,लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे,पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण उपाध्यक्ष आशा गायकवाड यांनी पुतळ्यास मेणबत्ती अगरबत्ती व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था शितळानगर देहूरोड व भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा यांच्या वतीने धम्मसदन बुद्ध विहार, शितळानगर येथे देहूरोड शहर अध्यक्षा पुष्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले,याप्रसंगी देहूरोड शाखा संघटक मोहन शिंदे यांनी घर तेथे सैनिक निर्मिती झाली पाहिजे यासाठी समता सैनिक दलावर आधारित गीत गायन केले, तर संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे गुरुजींनी स्वलिखित भैय्यासाहेब आंबेडकरांचा जीवनपट मांडणारे गीत गाऊन त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला,

बौद्धाचार्य विजय गायकवाड प्रकाश कांबळे रुईकर,के एच सूर्यवंशी, छाया शिंदे, नीलम काकडे, विजय पवार, पुष्पा सोनवणे, आशा माने, संगीता बनसोडे, शामा जाधव, यांनी भैय्यासाहेब आंबेडकरांचा जीवनपट मांडून शुभेच्छा व्यक्त केल्या,समता सैनिक दलाचे मेजर एम डी लोंढे सर यांनी रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी ऐतिहासिक बुद्ध विहार धम्मभूमी देहूरोड येथे होणाऱ्या समता सैनिक दल शिबिरात समाजातील तरुण-तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, हेच खऱ्या अर्थाने भैय्यासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला अभिवादन ठरेल असे मत व्यक्त केले,

यावेळी सीनियर डिव्हिजन ऑफिसर अजय जाधव सर, कंपनी कमांडर नंदिनी ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते मोजेस दास, डिव्हिजन ऑफिसर दत्ता शिंदे, प्लाटुन कमांडर बाळासाहेब गायकवाड, ऐतिहासिक बुद्ध विहार ट्रस्टी रोहन गायकवाड धम्म उपासक उपासिका उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा सरचिटणीस प्रकाश चां. कांबळे यांनी केले शेवटी कोषाध्यक्ष सु.भा. पवळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button