देहूरोड

साहित्य सम्मेलनाच्या पूर्व तयारीची बैठक धम्मसदन देहूरोड येथे यशस्वी संपन्न.

पुणे खबर १७ नोव्हेंबर २०२५
देहूरोड प्रतिनिधी – फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर (जिल्हा पुणे) यांच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये आयोजित होणाऱ्या साहित्य सम्मेलनाची पूर्वतयारी करण्यासाठी कार्यकारिणी संयोजन समितीने पिंपरी चिंचवड व देहूरोड शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत धम्मसदन, रमाई विद्यार्थी निवास संकुल, शितळानगर, देहूरोड येथे बैठक आयोजित केली होती. ही बैठक यशस्वीरीत्या पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी आदर्शांचे पूजन करण्यात आले, त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.एच. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात सम्मेलनाची दिशा, उद्देश आणि वसतीगृहाची संक्षिप्त माहिती सादर केली. फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी गेल्या ११ वर्षांपासून आयोजित सम्मेलनांचा लेखाजोखा मांडताना संस्थेच्या स्थानिक तसेच देश-विदेशातील उपक्रमांची विस्तृत माहिती दिली.यावेळी कश्यप साळुंखे आणि माजी प्राचार्य सुदामराव औचरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बैठकीला विनोद बगाडे, प्रभाकर जाधव, विकास जाधव, अशोक तथा आबा शिंदे, विशाल सावंत, निलेश सावंत, पत्रकार अशोक कांबळे, रजाक शेख, प्रविण जाधव, रजनीकांत क्षिरसागर, विजय कावळे, लिंबाजी कांबळे, कुमार वाघमारे, अमोल साबळे, सचिन जोगदंड, रेश्मा प्रकाश कांबळे, अनुसया कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रकाश कांबळे (रुईकर) यांनी केले, तर उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त/कार्याध्यक्ष अमोल नाईकनवरे, प्रविण साखरे, सुनील कांबळे आणि सोनाई मराठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button