समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय संविधान सन्मान रॅली समिती च्या संयुक्त विद्यमानेेने ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, विश्वसुर्यास समता सैनिक दलाची शानदार मानवंदना

दि. १६ ऑगस्ट २०२६
देेहूूरोड :-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम व देहूरोड शाखा,समता सैनिक दल, धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्था, बुद्ध विहार ट्रस्ट,संविधान सन्मान समिती, वंचित बहुजन आघाडी या धार्मिक, सामाजिक व राजकीय संस्था/व पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने ८० स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला,
या.प्रसंगी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर देहूरोड बाबासाहेबांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संरक्षण उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट लेफ्टनंट जनरल पी.एस.ढोबळे सर, महाराष्ट्र राज्य संघटक तथा पुणे जिल्हा प्रभारी विजय ओव्हाळ सर, पुणे जिल्हा पश्चिम सरचिटणीस दलितानंद थोरात, संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र बडेकर, संघटक प्रकाश कांबळे रुईकर बुद्ध विहार ट्रस्ट खजिनदार संजय ओव्हाळ, धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था संस्थापक/अध्यक्ष के.एच.सुर्यवंशी, भारतीय संविधान सन्मान रॅॅली समिती देहूरोड पंचक्रोशी संघटनेचे मुख्य समन्वयक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे,वंचित बहुजन आघाडी देहूरोड शाखा अध्यक्ष विशाल चव्हाण, भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम सरचिटणीस दलितानंद थोरात,देहूरोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने बॅन्ड पथकासह संचलन,सलामी व राष्ट्रगीत घेण्यात आले,
तदनंतर धम्मसदन थॉमस कॉलनी शितळा नगर देहूरोड येथे भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संघटक विजय ओव्हाळ व पुणे जिल्हा पश्चिम सरचिटणीस दलितानंद थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला,

याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखेच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प गुंफत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर केंद्रीय शिक्षक दलितानंद थोरात यांनी प्रवचन दिले,
देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक आंदोलने करावी लागली, अनेक क्रांतिकारकांना आपल्या जीवाचे बलीदान द्यावे लागले, शेवटी इंग्रजांनी आजच्याच दिवशी देशाला स्वातंत्र्य बहाल करुन त्यांचे अधिकार संपुष्टात आणले आणि आपला देश स्वतंत्र झाला, अनेक धर्म,पंथ,भाषांनी नटलेल्या देशात सर्वांना एकसंध ठेवण्यासाठी, सर्वांना समता स्वातंत्र्य,बंधुता, न्याय,व हक्कांवर आधारित मसुदा तयार करण्यासाठी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ७ जनांची मसुदा समिती स्थापन करण्यात आली १४१ दिवस चाललेल्या कार्यकाळात इतर सदस्यांकडून म्हणावे तसे सहकार्य लाभले नाही, म्हणून बाबासाहेबांना अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करावा लागला, सर्व समावेशक कायदा, मूलभूत हक्क,लोकशाही मूल्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सर्वांना न्याय मिळावा यासाठी २ वर्षं ११ महिने १७ दिवसाच्या कालावधीत भारतीय संविधान लिहिले आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला स्वाधीन केले आणि खऱ्या अर्थाने देशात लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता निर्माण झालेली लोकशाही निर्माण झाली असे मत केंद्रीय शिक्षक दलितानंद थोरात यांनी मांडले,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रकाश कांबळे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन सरचिटणीस राकेश आव्हाड यांनी केले व उपस्थिततांचे आभार कोषाध्यक्ष मोहन शिंदे यांनी मानले.




