देहूरोड

एम. बी. कॅम्प येथे मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दि.१५ ऑगस्ट २०२६
देहूरोड : मुस्लिम विकास विचार मंच एम. बी. कॅम्प प्रमुख तथा युवक काँग्रेस देहूरोड शहर उपाध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या आयोजनातून एम. बी. कॅम्प येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १६ च्या कार्यक्षम नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला.

कार्यक्रमाला मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष तथा मुस्लिम विकास विचार मंचचे सल्लागार गफूर शेख, रफिक लालसाब शेख, मक्का मस्जिद व्यवस्थापक अन्वरअली शेख, शकुर शेख, राजेश राऊत, अशपाक शेख, प्रदीप सोनार शोयब सय्यद, अशरफ शेख, मनोज पांडे, मुस्तफा शेख, हमीद शेख, विजू तरस,साजन शेख, एम. बी. कॅम्प मस्जिदचे मौलाना शोयब शेख, साबीर शेख सरफराज बाबूलाल कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत त्यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मुलांना मिठाई व बिस्कीट वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button