“गुंजेगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग”

पुणे खबर दि ३१ मे २०२६
गुंजेगाव (ता. दक्षिण सोलापूर) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गुंजेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील ज्येष्ठ नागरिक सुभाष पवार व उत्तम जाधव यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या न्यायप्रिय, दूरदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श समाजासमोर ठेवला.

वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारासोबतच समाजहित, महिला सक्षमीकरण, धार्मिक व सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक विकासकामांना प्राधान्य देऊन भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळविले. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळत असून त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन परमेश्वर ऐडके व ईराप्पा ऐडके यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सत्यवान भडकुंबे यांनी केले, तर शेवटी परमेश्वर ऐडके यांनी उपस्थितांचे आभार मानले .
यावेळी ज्ञानेश्वर साळुंखे, दत्ता पवार, अमोघसिद्ध पवार, आमीर शेख, समाधान जाधव, अकील मुजावर, विष्णू पाटील, खंडू हजारे, बाबुराव जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.




