देहूरोड

देहूरोड शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

पुणे खबर
दि.२३ जानेवारी २०२६
देहूरोड | प्रतिनिधी

मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने आज शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी दोन्ही महान विभूतींना हृदयपूर्वक विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा” या त्यांच्या प्रेरणादायी घोषवाक्याने संपूर्ण देशाला स्वातंत्र्यलढ्यात एकजुटीने लढण्याची प्रेरणा दिली, असे मत भरत नायडू यांनी व्यक्त केले. नेताजींचा अटल पराक्रम, त्याग व देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमाना साठी, सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करण्यात आला. त्यांचे निर्भीड विचार, स्पष्टवक्तेपणा व समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद कायम स्मरणात राहील,असे मुस्लिम विकास विचार मंच चे गफूर शेख बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही महान नेत्यांच्या स्मृतींना वंदन करत त्यांच्या आदर्शांवर चालत अधिक समृद्ध, एकजुटीचा व सर्वसमावेशक समाज घडवण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.

या कार्यक्रमास मुस्लिम विकास विचार मंच अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख, गफूर शेख, जाहिद शिकीलकर, अन्वरअली शेख, भरत नायडू, विलास हिनूकले, देवा कांबळे, बाबू हिरमेठकर रमेश जाधव यांच्यासह देहूरोड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button