बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी.

पुणे खबर
दि.२३ जानेवारी २०२६
देहूरोड : प्रतिनिधी
हिंदुत्वाची ज्वाला पेटवणारे, अन्यायाविरुद्ध वज्रासारखे उभे राहणारे हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या ऐतिहासिक पर्वावर आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीसूर्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड शहरात शुक्रवारी, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी शिवशक्ती आणि राष्ट्रभक्तीचा प्रखर हुंकार दुमदुमून गेला.

सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व श्री गणेश यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रशासक कैलास पानसरे, व आर.पी.आय. पुणे जिल्हा सचिव इंद्रपाल रत्तू, तसेच काँग्रेस अल्पसंख्याक मावळ तालुका अध्यक्ष गफूरभाई शेख, शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) रमेश जाधव यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला शिवसेना शहर संघटिका सुनंदा आवळे, मावळ तालुका संघटक अरुण गोंटे, अरुण जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास शिवसेना देहूरोड शहर प्रमुख संदीप बालघरे, मयूर पिंजण, सनी कदम, विजय दांगट, उपशहर प्रमुख भरत नायडू, माजी शहर प्रमुख राजेश शेलार, अमित पिंजण, विभाग प्रमुख गणेश सावंत, देवा कांबळे, सल्लागार विलास हिनुकले, सुनील गायकवाड, राकेश वाल्मिकी, शशिकांत सप्पागुरू, राजू कदम, कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष अली शेख, रामू सुतार, मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख,जाहिद शिकिलकर, घुसर गांधी, मानव अधिकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मिक्की कोचर, बसवराज कोरे, अशोक जोशी, काका लक्ष्मी अक्का मिनगी, व्यापारी कांतीलाल पारेख, मनोहर पवार, विशाल गंधाले आदी मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना देहूरोड शहर प्रमुख संदीप बालघरे यांनी केले होते.




