Uncategorized

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील दुर्घटनेविषयी माहितीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन.

पुणे खबर वृत्तसेवा. १५ जून २०२५

मावळ :- तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा ( इंदुरी) येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना रविवार, दिनांक 15/06/2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास घडली आहे. सदर लोखंडी पूल हा आजुबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून सदर लोखंडी पूल हा सुमारे 30 वर्ष जुना आहे.

सदर कुंडमळा या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षाविहारासाठी आले असता लोखंडी पुल कोसळून त्या खाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच सदर ठिकाणी बचाव कार्यासाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( NDRF) चे 2 पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलिस यंत्रणा, केंद्रीय राखीव पोलिस दल(CRPF), आपदा मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, वन्यजीव संघटना यांचे मार्फत शोधकार्य सुरु केले होते. सदर दुर्घटनेमध्ये एकूण 51 व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तीनां रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1) पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल आणि 4) युनिक हॉस्पिटल मध्ये उपचारा करीता दाखल केले आहे.

सदर घटनेत एकूण 04 व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरु आहे. सदर इंद्रायणी नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. तसेच सदर घटनास्थळी मा. मंत्री – आपत्ती व्यवस्थापन, मा. मंत्री- मदत व पुनर्वसन, मा. विभागीय आयुक्त – पुणे विभाग, सुप्रिया सुळे खासदार बारामती लोकसभा, आमदार सुनील शेळके मावळ विधानसभा, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी मावळ, तहसिलदार मावळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते. सदर घटनेच्या अनुषंगाने अधिक माहिती आवश्यक असल्यास नियंत्रण कक्षाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.टोल फ्री नंबर 1077 – नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.: 020- 26123371, 26133522, 26133523 विठ्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी) : 8975232955 राहुल पोखरकर ( आपत्ती व्यवस्थापन कक्ष सहाय्यक) 8888565317

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button