निगडी

विश्वशांती बुद्ध विहारात वर्षावास समारोप व भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड, दि. २२ ऑक्टोबर २०२५: दळवी नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी येथील विश्वशांती बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेच्या वार्ड शाखेचे उद्घाटन आणि वर्षावास समारोपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा पिंपरी-चिंचवड जिल्हा अध्यक्ष राधाकांत कांबळे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा पिंपरी-चिंचवड जिल्हा सरचिटणीस आयु. डी. व्ही. सुरवसे गुरुजी व कोषाध्यक्ष आयु. रामचंद्र आचलकर गुरुजी, आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड सर्वजित बनसोडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलचंद बनसोडे होते, तर सूत्रसंचालन संजय लोखंडे यांनी केले.या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा फ-विभाग अध्यक्ष प्रशांत नाटेकर गुरुजी, महिला विभाग अध्यक्षा अरुणाताई रणदिवे, भीमाताई तुळवे, फ-विभाग कोषाध्यक्ष अशोक शिवशरण, सरचिटणीस रणजीत डोंगरे, समता सैनिक युनिट लीडर अशोक कदम, वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष दीपक भालेराव, कार्यालयीन सचिव बुद्ध भूषण अहीरे, वंचित बहुजन आघाडी निगडी विभाग अध्यक्ष सुधीर लोंढे, सुधाकर म्हस्के, नालंदा बुद्ध विहार व्यवस्थापक गौतम पटेकर, तसेच धबडगे, के. डी. वाघमारे, रमेश सिरसाठ, शिरीष भालेराव, जानराव साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनी नवनिर्वाचित वार्ड शाखा कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे नियोजन श्रीरंग ओव्हाळ, दिनेश सोनवणे, धर्मेंद्र भालेराव, प्रकाश साळवे, शिवाजी शेलार, दिलीप खंदारे, हीराचंद बनसोडे, वंदना भालेराव, कालिंदा सोनवणे, सुमन ओव्हाळ, अर्चना शेलार, कांता जगताप, सत्यशिला बनसोडे, मीरा शेलार, शशीकला यादव, अलका बनसोडे, उषा भालेराव, मीरा सोनवणे, शामला बनसोडे, लक्ष्मी कदम, सुरेखा सोनवणे आणि शांताराम नाटेकर यांनी यशस्वीपणे केले. कार्यक्रमाच्या समारोपात वार्ड शाखेच्या वतीने खिरदान करण्यात आले.हा कार्यक्रम सामाजिक एकता आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button